top of page

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस द्वारा केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध

  • Aug 5
  • 1 min read

जनचेतना/गोंदिया/सचिन बोपचे : काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या अधिकृत अकाउंट वरून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्याचा गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध नोंदविला गेला. गोंदिया येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रफुल पटेल व खासदार राजेंद्र जैन यांच्या निर्देशानुसार काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.



पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अवमान कधीही स्वीकारला जाणार नाही. हा केवळ आदरणीय सुनेत्राताईंचा नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेचा अपमान आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध करून महाराष्ट्रातील सर्व महिलांची सार्वजनिक माफी काँग्रेस पक्षाने मागावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 
 
 

Comments


bottom of page