top of page

दवनीवाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रशांत भुते यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला गणेश उत्सव मंडळाचा उपक्रम

Oct 3
2 min read

नितेश एम. आगाशे यांच्या पुढाकाराने अत्री येथे सायबर जनजागृती कार्यक्रम उत्साहात


जनचेतना/गोंदिया/पांडुरंग मानकर :- अत्री येथील मसकऱ्या गणेशजी महिला गणेश उत्सव मंडळाच्या वतीने सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नितेश एम. आगाशे आणि महिला समितीच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला दवनीवाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रशांत भुते प्रमुख उपस्थित होते. यावेळी महिला समिती व ग्रामस्थांच्या वतीने ठाणेदार प्रशांत भुते यांना आरतीचा मान देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर नागरिकांना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, बनावट फोन कॉल, ओटीपी, बँकिंग फसवणूक तसेच सोशल मीडियाच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रणय बरेजु, पोलिस कॉन्स्टेबल तथा सायबर को-ऑर्डिनेटर, पोलिस स्टेशन दवनीवाडा यांनी सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पोलिस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांनीही नागरिकांना आवश्यक माहिती दिली. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले.



कार्यक्रमाला उपस्थिती


कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य विजय बिसेन, माजी तंटामुक्त अध्यक्ष सुरेश तुमसरे, आदिवासी गोवारी समाज अध्यक्ष ओमप्रकाश वरठी, प्रेमलाल बिसेन, धनेद्र वाघाडे, प्रमोद बिसेन, निलेश मरघडे, लेकचंद मरघडे, बडू भैय्या परिहार, योगराज लांजेवार, देवदास माहूरे, जितेंद्र बिसेन, रामदायल बिसेन, परिमल बिसेन, शालिकराम बागडे, पुराणलाल पटले, ललीता वाघाडे, प्रभा बिसेन, स्वर्णा जनबंधू, शांता लांजेवार, रेखा मरघाडे, पुस्तकला बिसेन, चंद्रकला बिजेवार, सुनिता कापसे, सुनिता बिसेन, रामेश्वरी बिसेन, मिराबाई बरठी, किलाबाई वरठी, सारजावाई वरठी, सरिता बागळे, लता कोहरे, चिंतन बरठी, गंगा आगास, जोती कावळे, फुलवंता बागळे, कवीता मरघडे, बसवंता मरघडे, मनिशा कोहरे, निशा कोहरे, प्रिती बिसेन, सुनिता वरटी, घुश्पता वरठी, गुणवंता वरठी, अंतकला बिसेन, सुनिता पुरनलाल बिसेन, अनुसया बिसेन, कविता भुजाळे, आशा बिसेन, कौतिका बिसेन, प्रभा हिरालाल बिसेन, रूची जनबंधु, आशा वरठी, पार्बता कावळे, उर्मिला वरठी, माया कोहरे आणि राधीका कोहरे यांच्यासह महिला गणेश उत्सव मंडळाच्या सदस्य व समस्त गावकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.सायबर जनजागृती कार्यक्रमातून नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचा आणि सायबर गुन्ह्यांविरोधात सतर्क राहण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



 
 
 

Comments


bottom of page