top of page

फत्तेपूर उपकेंद्रासाठी निधी देण्याची मागणी; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

  • Aug 19
  • 1 min read

जनचेतना/गोंदिया :-  तालुक्यातील फत्तेपूर येथे मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामासाठी तातडीने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी फत्तेपूरचे उपसरपंच धनंजय रिनायत व भाजपचे पदाधिकारी चंद्रभान तरोणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोल्हार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. फत्तेपूर व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी तसेच आवश्यक वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे निधी वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोल्हार यांनी सकारात्मक भूमिका दर्शवत येत्या काही दिवसांत निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले.


उपकेंद्र सुरू झाल्यास नागरिकांना दिलासा


फत्तेपूर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू झाल्यास परिसरातील ग्रामस्थांना प्राथमिक उपचार, आरोग्य तपासणी व आवश्यक वैद्यकीय सेवांसाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे या उपकेंद्राचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करून आरोग्य सुविधा कार्यान्वित करण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.


प्रमुख मागणी : मंजूर फत्तेपूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देऊन बांधकामाला गती देण्यात यावी.



 
 
 

Comments


bottom of page