top of page

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी २३ रुग्ण नागपूरला रवाना

Sep 29
1 min read

राधाकृष्ण गणेश उत्सव समिती, मुंडीपारचा सामाजिक उपक्रम; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


जनचेतना/गोरेगांव :-  राधाकृष्ण गणेश उत्सव समिती, मुंडीपार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरातून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या २३ रुग्णांना आज पुढील उपचारासाठी नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे रवाना करण्यात आले. या रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर यांच्या सहकार्याने मोफत करण्यात येणार आहेत. यावेळी डॉ. लक्ष्मणजी भगत, सभापती, अर्थ व बांधकाम, जिल्हा परिषद गोंदिया यांची उपस्थिती होती.



गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राधाकृष्ण गणेश उत्सव समितीने हा उपक्रम राबविला आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना मोतीबिंदूसारख्या आजारावर मोफत उपचार मिळत असल्याने या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

समितीच्या या सामाजिक उपक्रमामुळे गरजू रुग्णांना दृष्टीसंबंधी उपचाराची सुविधा मिळत असून, सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श या माध्यमातून निर्माण झाला आहे.



 
 
 

Comments


bottom of page