top of page

राजकारणात भूकंप! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला

  • May 12
  • 1 min read

जनचेतना/मुंबई/सचिन बोपचे : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्याक्ष  सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहचले आहे. राजकरणातील ही सर्वात मोठी घडामोड असून  सुनील तटकरेंच पक्षांतील महत्त्व कमी झाल्याच्या चर्चानंतर आज सुनील तटकरे भेटीला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटातील नाराजी नाट्यानंतर तटकरे शरद पवारांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. अद्याप या भेटीचे कारण समोर आले नाही. मात्र बऱ्याच सुनिल तटकरे हे बरेच दिवस शरद पवार यांची भेटीची वेळ मागत होते. आज ती भेटीची वेळ मिळाल्यानंतर सुनिल तटकरे सिल्व्हर ओकवर पोहचल्याची प्राथमिक आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना वगळल्याने महाराष्ट्रासह देशभरात चर्चा होत आहे. पटेल तटकरे यांना पदच्युत केल्याचेही वृत्त राजकीय वर्तुळात आहे. असे असताना तटकरे यांनी शरद पवार यांच्या भेटीला जाणे, याचे अधिक महत्त्व आहे. शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीचे कारण जरी अस्पष्ट असले तरी ही भेट निश्चित राजकीय मुद्द्यावरच आहे, असे राजकीय जाणकार सांगतात. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगानेच ही भेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.



 
 
 

Comments


bottom of page