top of page

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी

  • Aug 2
  • 1 min read

जनचेतना/तिरोडा/हितेश :- तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील साई महिला महाविद्यालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राध्यापक एस. जी. भांडारकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.


यावेळी बोलताना प्राध्यापक भांडारकर म्हणाले, "अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर ते एक क्रांतिकारी विचारवंत होते. त्यांनी आपल्या लेखणीतून व पोवाड्यातून शोषितांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचे विचार अंगीकारूनच आपण समतेचा समाज घडवू शकतो." कार्यक्रमात विद्यार्थिनींनी अण्णाभाऊंच्या जीवनावर भाषणे सादर केली. तसेच 'फकिरा' कादंबरीवर आधारित नाटिका आणि अण्णाभाऊंच्या पोवाड्यांचे गायन सादर करून परिसरात प्रबोधनाचा संदेश दिला. विद्यार्थिनींनी लिहिलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.


या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. आर. टी. तिडके , प्रा ए.ए. बोरकर, पी. डी. भूतांगे, एन. डी. गौतम पुजा गणवीर सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन. ए. लिल्हारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पी. ए. कुंभरे यांनी मानले.



 
 
 

Comments


bottom of page