top of page

होळीनिमित्त रेल्वेकडून प्रवाशांना मोठी भेट

  • Mar 23
  • 2 min read

जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच



 रेल्वे प्रवाशाने होळी सणानिमित्त प्रवाशांना मोठी भेट दिली आहे. मध्य रेल्वे मार्गावर नवीन साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू करण्यात आली असून अतित्वातील एका गाडीचा विस्तार केला आहे. रेल्वेच्या या निर्णयाचा प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन तसेच त्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने उधना – मालदा टाउन साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राजकोट – महबूबनगर साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी (०९५७५/०९५७६) च्या फेऱ्यांमध्येही विस्तार करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०३४१८ / ०३४१७ उधना – मालदा टाउन साप्ताहिक विशेष गाडीच्या आठ फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०३४१८ उधना – मालदा टाउन विशेष ०२ मार्च २०२६ ते २३ मार्च २०२६ या कालावधीत प्रत्येक सोमवार रोजी उधना येथून १२.३० वाजता सुटेल आणि मालदा टाउन येथे बुधवारी ०५.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०३४१७ मालदा टाउन – उधना विशेष २८ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत प्रत्येक शनिवार रोजी मालदा टाउन येथून १२.१५ वाजता सुटेल आणि उधना येथे सोमवारी ०२.१५ वाजता पोहोचेल.

चलथान, व्यारा, नवापुर, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, भुसावल, इटारसी, पिपरिया, मदन महल, कटनी, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय, सासाराम, गया, तिलैया, नवादा, शेखपुरा, किऊल, अभयपूर, जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहलगाव, साहिबगंज, बरहरवा व न्यू फरक्का या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. या गाडीत एसी थ्री – टियर, स्लीपर वर्ग तसेच जनरल सेकंड क्लासचे डबे असतील.

राजकोट – महबूबनगर साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीचा विस्तार केला आहे. गाडी क्रमांक ०९५७५ राजकोट – महबूबनगर (प्रति सोमवार) २ मार्च २०२६ ते ३० मार्च २०२६ पर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९७६ महबूबनगर – राजकोट (प्रति मंगळवार) ०३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. या गाडीच्या वेळापत्रकात व थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्रवासी तिकीट आरक्षणासाठी रेल्वेचा ॲप डाउनलोड करू शकतात. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. या रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांना मोठी सुविधा होणार आहे.


Comments


bottom of page