top of page

फडणवीसांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंचा निषेध; गोंदियात पत्रकार परिषदेत घणाघात

  • Apr 13
  • 1 min read

गोंदिया : राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार Nana Patole यांनी आज 12 एप्रिल रोजी गोंदियात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्यावर तसेच भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी खासदार प्रशांत पडोळे, जिल्हा अध्यक्ष दिलीप बन्सोड सह कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रपूर येथील एका कार्यक्रमात फडणवीस यांनी काँग्रेस नेते Rahul Gandhi यांच्यावर टीका करत ते स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत असल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांचा पराभव हा जनतेमुळे नसून निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींमुळे झाला आहे. जर खरोखर लोकप्रियतेची चाचणी घ्यायची असेल, तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हान त्यांनी दिले.


याचवेळी गोंदियातील पत्रकार परिषदेत पटोले यांनी निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले. पंतप्रधान Narendra Modi आणि भाजपच्या प्रभावाखाली निवडणूक आयोग काम करत असून तो “चपराशी” प्रमाणे वागत आहे, अशी टीका त्यांनी केली. बॅलेटवर निवडणुका घेतल्यास भाजपचा खरा चेहरा उघड होईल, असा दावा त्यांनी केला.


दरम्यान, राज्यात गाजत असलेल्या भोंदू खरात प्रकरणावरही पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला. भाजप सरकार या प्रकरणाचा राजकीय वापर करत असून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. खरात प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधित सर्वांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.


तसेच, प्रसिद्ध गायिका Asha Bhosle यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे पटोले म्हणाले.


बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भात बोलताना, उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी Sunetra Pawar यांची निवड निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यामुळे त्या बिनविरोध निवडून येतील, असेही पटोले यांनी नमूद केले.

 
 
 

Comments


bottom of page