top of page

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गोंदियात नीव’ प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार.

  • Mar 22
  • 1 min read

5 वर्षांत गोंदियातील जवळपास 8000 हजार ग्रामीण व आदिवासी कुटुंबांच्या सक्षमीकरणाचे उद्दिष्ट

जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच



गोंदिया जिल्हा प्रशासन आणि ‘प्रधान’ संस्था यांच्यामध्ये पाच वर्षांच्या ‘नीव’ (NEEV-Nurturing Equitable Empowerment & Livelihoods in Vidarbha) प्रकल्प (2025–2030) अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. हा प्रकल्प टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असून,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनाच्या विकसित विदर्भ संकल्पनेशी सुसंगत असा हा प्रकल्प आहे.

 

जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी प्रजित नायर व प्रधान संस्थेचे कार्यकारी संचालक श्री सरोज महापात्रा यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. याप्रसंगी डॉ. हर्षा वशिष्ठ, श्री कुंतल मुखर्जी आणि श्री दिगंबर चौधरी उपस्थित होते.या प्रकल्पांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील 8000 ग्रामीण व आदिवासी कुटुंबांना थेट लाभ मिळणार असून, हा एकूण प्रकल्प उद्दिष्टांचा निम्मा हिस्सा आहे. प्रकल्पाद्वारे पुनरुत्पादक शेती पद्धती, जलसंधारण व जलस्रोत विकास, वनआधारित उपजीविका, पशुपालन व मत्स्य व्यवसाय वृद्धी, महिलांच्या नेतृत्वाखालील संस्थांचे बळकटीकरण तसेच ग्रामपंचायत नियोजन प्रक्रियेचे सुदृढीकरण यावर विशेष भर दिला जाणार आहे.

 

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याचा या प्रकल्पाचा हेतू आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर नियोजन प्रणाली मजबूत करून स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अधिक प्रभावी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.हा प्रकल्प पुढील पाच वर्षांत गोंदिया जिल्ह्यात शाश्वत उपजीविका, मजबूत करणे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकास साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.


Comments


bottom of page